यानंतर खराचा ससैन्य नाश झाल्यामुळे फार उद्विग्न झालेली शूर्पणखा स्वत:च रावणाकडे गेली. स्वत:चा झालेला अपमान तिने रावणाला सांगितला व त्याला फटकारले कीं ’जनस्थानातील तुझी सत्ता रामाने उखडून टाकली याचा तुला पत्ता नाही काय?’ तिच्याकडून सर्व हकीगत ऐकून रावण चिंतातुर झाला. शूर्पणखेने राम-लक्ष्मण-सीता यांचे बळ व सौंदर्य याचे वर्णन रावणाला ऐकवले. मी सीतेला तुझ्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत होते म्हणून मला लक्ष्मणाने विरूप केले असे खोटेच सांगितले. ’सीतेला तूं पळवून आण’ असे तिने सुचवले नाही. रावणाने स्वत:च मंत्रिगणांशी बोलणे करून सीतेचे हरण करण्याचा बेत नक्की केला.
रावण रथातून समुद्रकिनार्यापर्यंत आला व मग विमानाने भारतात येऊन पुन्हा मारीचाला भेटला. विमानाचा उल्लेख आहे पण वर्णन नाही. विमान म्हणजे काय हे गूढच आहे. रावणाने पुन्हा मारीचाला खर-दूषणांचा ससैन्य नाश झाल्याचे सांगून रामाने दंडकारण्याचे अभयारण्य केले आहे असे म्हटले. रामाला त्याच्या पित्याने क्रोधाने पत्नीसह घराबाहेर काढले आहे असेहि म्हटले व सीतेला पळवून आणण्याचा बेत सांगून मारीचाचे सहाय्य मागितले. ते ऐकून मारीचाचा भयाने थरकाप झाला. त्याला रामाच्या पराक्रमाचे दर्शन घडलेले होते. त्याने रावणाला पुन्हापुन्हा विनवले कीं ’तूं हा बेत मनात आणू नको, रामाने पितृवचनाचा मान राखण्यासाठी वनवास पत्करला आहे. त्याच्याशी वैर धरू नको. तुला ते झेपणार नाही. तूं बिभीषणाचा सल्ला घे. विश्वामित्राच्या सांगण्यावरून राम बालवयातच आमच्या पारिपत्यासाठी आला तेव्हा आमचा सर्वनाश झाला. माझा जीव कसाबसा वांचला. हल्लीच पुन्हा मृगरूपाने दोन मित्रांबरोबर दंडकारण्यात गेलो असतां रामाच्या बाणाने मरतांमरतां वांचलों, माझे मित्र मेले. त्यामुळे मला रामाची फार भीति वाटते. एकतर तूं सरळ रामाशीं युद्ध कर किंवा सर्व विसरून लंकेत सुखाने रहा. खराने रामावर आक्रमण केले व रामाने त्याला युद्धात मारले यांत त्याचा काय दोष? त्याच्याशी वैर धरू नको’. मारीचाने पुन्हापुन्हा हिताचा सल्ला दिला पण रावणाने तो मानला नाही.
Sunday, May 16, 2010
Thursday, May 13, 2010
अरण्यकांड - भाग ५
शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी खर, दूषण, त्रिशिरा हे तीन वीर व जनस्थानातील त्यांची मोठी सेना चालून आली. त्या सैन्यात हे तीन वीरच धनुष्य-बाणाने लढणारे होते, इतर सर्व हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्राने लढणारे होते. हे जनस्थान पंचवटीच्या जवळपासच होते व स्थानिक नरभक्षक लोकांच्या सहायाने येथे रावणाने आपले ठाणे वसवले होते असे म्हणावे लागते. अद्याप त्यांचा आर्यावर्तातील कोणा राजाशी संघर्ष झालेला वर्णिलेला नाही. पण संभाव्य संघर्षाची ही रावणाची पूर्वतयारी दिसते.
लक्ष्मणाला सीतेच्या संरक्षणासाठी ठेवून रामाने एकट्यानेच त्याना तोंड दिले. युद्धाचे खुलासेवार वर्णन वाचावयास मिळते. सर्व सैन्य मारले जाऊन एकटा खर उरला व तोही अखेर मारला गेला. रामाने एकहि ’अस्त्र’ वापरल्याचा उल्लेख नाही. फक्त धनुष्यबाण वापरून कितीहि पराक्रमी धनुर्धर असला तरी किती सैन्य मारू शकेल? महाभारतात सर्व धनुर्धर मोठ्या सैन्याविरुद्ध अस्त्रांचा सर्रास वापर करतात. तेव्हा खराचे सैन्य १४,००० होते ही अतिशयोक्ति म्हटली पाहिजे. युद्ध संपल्यावर लक्ष्मण व सीता गुहेतून बाहेर आलीं व रामाला फारशा जखमा झालेल्या नाहीत असे पाहून आनंदित झालीं.
खराचा ससैन्य नाश झाल्याचे वृत्त अकंपन नावाच्या वांचलेल्या सैनिकाने रावणाला सांगितले. रामाच्या बळाचे व युद्धकौशल्याचे त्याने वर्णन केले. ’रामाला युद्धात हरवणे सोपे नाही तेव्हा सीतेला पळवून आणलीस तर राम विरहानेच मरेल’ असे त्याने रावणाला सुचवले. हा सीताहरणाबाबत पहिला उल्लेख आहे. हा रावणाचा स्वत:चा मूळ बेत नाही. मात्र रावणाला हा सल्ला पटला व तो एकटाच निघाला व मारीचाच्या आश्रमात जाऊन त्याला भेटला. जनस्थानातून रावणाचे ठाणे उठल्यामुळे काहीतरी केले पाहिजे असे त्याला जाणवले. ही रावण-मारीच यांची पहिली भेट. तिच्याबद्दल आपण वाचलेले नसते! मारीच हा ताटकेचा पुत्र असल्यामुळे मदत करील अशी रावणाची साहजिकच अपेक्षा होती. हा मारीचाचा आश्रम कोठे होता याचा काही खुलासा नाही.
मात्र यावेळी मारीचाने रावणाला म्हटले, ’सीतेच्या हरणाचा सल्ला तुला देणारा तुझा शत्रूच म्हटला पाहिजे. रामाच्या तूं वाटेस जाऊं नको ते तुला झेपणार नाहीं. तूं लंकेत सुखाने राज्य कर व रामाला पंचवटीत सुखाने राहूंदे!’ नवल म्हणजे रावणाने हा सल्ला मानला व तो लंकेला परत गेला!

Saturday, May 8, 2010
अरण्यकांड - भाग ४
राम-लक्ष्मण-सीता पंचवटीत राहू लागल्यावर घडलेला महत्वाचा प्रसंग म्हणजे शूर्पणखेच्या भेटीचा. हा वेळपर्यंत विराध सोडून इतर कोणाही नरभक्षक राक्षसाशी वा रावणाच्या अनुयायाशी रामाची भेट वा झगडा झालेला नव्हता. रावणपक्षाचा एक खर नावाचा प्रमुख वीर, शूर्पणखेचा भाऊ व रावणाचाहि भाउबंद, मोठ्या सैन्यबळासह पंचवटीजवळच जनस्थानात राहत होता. त्याला राम-लक्ष्मण पंचवटीत आल्याचे माहीत नव्हते, पण सान्निध्यामुळे संघर्ष केव्हातरी अटळ होता. खराच्या सैन्यात धनुष्यबाणाने लढणारे वीर थोडेसेच होते. इतर सर्व सैन्य हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्रांनी लढणारे होते असे पुढील समरप्रसंगाच्या वर्णनावरून दिसते. हे सर्व स्थायिक नरभक्षक जमातींची असावे.
राम दिसल्यावर शूर्पणखेने त्याची अभिलाषा व्यक्त केली. राम-लक्ष्मणांनी तिची टवाळी केली. तिला राक्षसी म्हटले आहे व विद्रूप असे वर्णन केले आहे तसेच ’सुंदर’ असेहि म्हटले आहे. ती रावणाची बहीण, म्हणजे नरभक्षक जमातीची खासच नव्हती. त्यामुळे तिचे विद्रूप असे वर्णन तिला राक्षसी म्हणण्याशी निगडित आहे. रावण व त्याचे कुटुंब व प्रमुख मंत्री, हे यज्ञसंस्कृति मानणारे होते. यज्ञांचा विध्वंस करणार्यांपैकी नव्हते. त्यांचा राम प्रतिनिधित्व करणार्या आर्यकुळांशी दीर्घकाळाचा वैरभाव कां होता? सत्तास्पर्धा हे एकच कारण होते काय? आर्यावर्तातील क्षत्रियकुळांशी वैर होते म्हणून तर रावण लंकेमध्ये सुरक्षित राजधानी बनवून राज्य करत होता काय? हे एक न उलगडलेले कोडे आहे. काही वेळ शूर्पणखेची टवाळी केल्यावर राम-लक्ष्मणानी तिला समजावून परत पाठवण्याऐवजी तिला विद्रूप केले याला खरे तर काही सबळ कारण नव्हते. हे मुद्दाम खुसपट काढल्यासारखेच वाटते! जणू राम-लक्ष्मणाना आता, रावणाबरोबर अद्याप न घडलेला, संघर्ष हवाच होता.

Tuesday, May 4, 2010
अरण्यकांड - भाग ३
पंचवटीत रामाचे वास्तव्य फारसे झाले नाही. पंचवटीत रहावयास आले तेव्हां शरद ऋतु चालू होता असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानंतर हेमंत व शिशिर हे दोनच ऋतु राम-लक्ष्मण-सीता यांचे पंचवटीत वास्तव्य झाले. रावणाने सीतेचे हरण केले तेव्हां शिशिर संपत आला होता कारण नंतर राम-लक्ष्मण वनात भटकत असताना हा वसंत ऋतु चालू आहे असे राम वारंवार म्हणतो व वसंताच्या शोभेचे वर्णन करतो. पद्मपुराणात सीताहरणाची तिथि माघ व. अष्टमी अशी दिली आहे. हा उल्लेख रामायणाच्या भाषांतरातहि आहे. तेव्हा शिशिर अर्धा संपला होता याला दुजोरा मिळतो.
चित्रकूट व पंचवटी दोन्ही ठिकाणी रामाचे वास्तव्य अल्पकाळच झाले हे स्वच्छ असूनहि चित्रकूटात समजूत आहे कीं रामाचे चित्रकूटात दीर्घकाळ वास्तव्य झाले व महाराष्ट्रात समजूत आहे की पंचवटी हे रामाचे वनवासातील प्रमुख वास्तव्यस्थळ! चित्रकूटापासून पंचवटीपर्यंत रामाचा प्रवास दीर्घकाळ व अज्ञात मार्गाने झाला. अनेक नद्या, विंध्य व सातपुडा ओलांडावे लागले असणार. अजूनहि हा भाग दुर्गम आहे व आदिवासी वसतीचा आहे. या आदिवासी समाजांमध्ये रामाच्या प्रवासमार्ग व वास्तव्याबाबत असलेल्या समजुतींचे संकलन व अभ्यास केला तर कदाचित रामाच्या प्रवासमार्गावर काही प्रकाश पडेल. असा कांही अभ्यास वा संशोधन झाले असल्यास माहीत नाही. या संदर्भात, डॉ. सांकलिया नावाच्या पुरातत्त्ववेत्याच्या मते राम विंध्य ओलांडून दक्षिणेत आलाच नाही व रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हेच असे वाचलेले स्मरते. याला मुख्य आधार म्हणजे, सालवृक्ष दक्षिण भारतात तुंगभद्रा परिसरात, जेथे किष्किंधा होती असे वर्णनावरून दिसते, तेथे आढळत नाहीत, याउलट, मध्यभारतात, सातपुड्याच्या उत्तरेला मुबलक होते. नेपानगरची न्यूजप्रिंट फॅक्टरी सालाइ झाडांपासून कागद बनवण्यासाठी बांधली गेली. (गेल्या काही वर्षात मात्र या सलाई वृक्षांची वारेमाप तोड झाली आहे.) डॉ. सांकलियांपाशी इतरहि अनेक आधार असतीलच. त्यांचे मत खरे असेल तर मग पंचवटी (गोदावरी तीरी म्हटलेली)व जनस्थान महाराष्ट्रात नव्हे तर कोठे होतीं? खरे खोटे ’राम जाणे!’

Monday, April 26, 2010
अरण्यकांड - भाग २
रामाने मुनींना राक्षसांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते,पण सीतेने नवव्या सर्गात असे म्हटले कीं ’आपण वनात असताना मुनिवृत्तीने रहावे, क्षात्रधर्माने वागूं नये, प्राण्यांची हिंसा करू नये व राक्षसांशीहि अकारण वैर धरूं नये. अयोध्येस परत गेल्यावर मग क्षात्रधर्माचे पालन करावे!’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही! विराधाने स्वत:च राम-लक्ष्मणांवर हल्ला केला होता, मुनीना त्रास दिला म्हणून त्याचे पारिपत्य केले नव्हतेच.
रामाचा प्रवास चालूच होता. वाटेत लागलेल्या पंचाप्सर नावाच्या सरोवराचे वर्णन सर्ग ११ मध्ये येते पण स्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत त्यामुळे राम कोठवर पोचला होता याचा उलगडा होत नाही. यानंतर रामाने निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत निवास करीत दहा वर्षे काढली असा स्पष्ट उल्लेख आहे. चित्रकूट सोडल्यापासून आतापर्यंत रामाने कुटी बांधून कोठेहि वास्तव्य केलेलेच नाही! चौदा वर्षांपैकी ३-४ महिने चित्रकूटावर राहून त्यानंतर दीर्घकाळ प्रवासात व निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत व्यतीत झाला. विराध सोडून एकाही राक्षसाशी युद्ध झाले नाही. निव्वळ रामाच्या वावरामुळे राक्षसांचा उपद्रव शमला होता असे म्हणावे लागते. या दीर्घ प्रवासानंतर राम पुन्हा सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला व त्यांचा सुतीक्ष्णाने सन्मान केला.
मग रामाला अगस्त्य ऋषींना भटण्याची इच्छा झाली व सुतीक्ष्णानेहि दुजोरा देऊन जवळच चार योजनांवरील अगस्त्याच्या आश्रमाचा रस्ता सांगितला. वाटेतील अगस्त्याच्या भावालाहि भेट देऊन राम अगस्त्य मुनीना भेटला. अगस्त्यांनी रामाला अनेक आयुधे दिलीं. रामाने अगस्त्यांना विचारले कीं मी कोठे कुटी बांधावी? अगस्त्यांच्या आश्रमस्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत पण त्याने रामाला सुचवले कीं दोन योजनांवरील पंचवटी हे स्थळ तुमच्या निवासासाठी योग्य. येथे मात्र ’गोदावरीतीराजवळील’ असा स्पष्ट भौगोलिक संदर्भ प्रथमच मिळतो. सध्याच्या पंचवटीचे गोदासान्निध्य पाहतां तीच रामायणातील पंचवटी मानतां येते. चित्रकूट ते पंचवटी एवढे दीर्घ अंतर रामाने ११-१२ वर्षे प्रवासात काटले असे दिसते मात्र प्रवास मार्ग कळत नाही. पुढे इतिहासकाळात उत्तरेकडून दक्षिणेत येण्याचा मार्ग बर्हाणपुरावरून खानदेशातून (मोगलकाळी) वा राजस्थान, सौराष्ट्र गुजरात असा असे. राम मध्य्भारतातून विंध्य-सातपुडा ओलांडून आला असावा.
पंचवटीच्या वाटेवर जटायु भेटला, मनुष्यवाणीने बोलला व मीहि तुमच्या आश्रयाने राहीन असे म्हणाला. तेव्हा ही एक आर्य़ांशी मैत्रीने वागणारी मानवांचीच जमात म्हटली पाहिजे.
पंचवटीवर लक्ष्मणाने कुटी बांधली. चित्रकूटावरहि त्यानेच बांधली होती. सेतू बांधायला राम इंजिनिअर होता का असा प्रश्न हल्ली केला गेला. कुटी बांधणारा लक्ष्मण बहुधा इंजिनिअर असावा ! पंचवटीवरहि रामाचे वास्तव्य ३-४ महिनेच झाले. कसे ते पुढच्या भागात पाहूं.

Saturday, April 24, 2010
अरण्यकांड - भाग १
अत्रिऋषींच्या भेटीपाशी अयोघ्याकांड संपले होते. अरण्यकांडामध्ये रामाचा तेथून पुढला वनातील प्रवास वर्णिला असून सीताहरणापर्यंत त्याचा विस्तार आहे. अत्रिऋषींच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात गेले. राक्षसांचा उपद्रव असलेल्या प्रदेशात ते बराच काळ फिरत राहिले असे म्हटले आहे. अनेक मुनींना भेटले सर्वांनी राक्षसांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी करून तूं आमचे रक्षण कर असे म्हटले. रामाने ते मान्य केले. हे मुनीना सतावणारे, नरभक्षक, यज्ञाचा विध्वंस करणारे (मानव)समाज म्हणजे राक्षस ही एक वेगळीच जमात म्हटली पाहिजे. रावणालाहि राक्षस म्हटले आहे पण रावण स्वत: सुसंस्कृत, यज्ञप्रेमी व विद्वान, त्याचे अनेक मंत्री व प्रजाजनहि यज्ञ करणारे असे पुढे वर्णन केले आहे त्यांचे या जमातीशी काही नाते मानता येणार नाही. मात्र ही नरभक्षक जमात रावणाच्या अंकित होती असे दिसते व त्यांची लंकेतहि वसती असावी कारण रावणाच्या सैन्यात त्यांचा समावेश होता.
रामाची गाठ विराध नावाच्या राक्षसाशी पडली. कोणत्याही शस्त्राने न मरण्याचा वर त्याला ब्रह्मदेवाने दिला होता! तो रामाशी बोलला! कोणत्या भाषेत ते सांगितलेले नाही. आपल्या वराची माहिती त्यानेच रामाला दिली. महत्प्रयासाने राम-लक्ष्मणांनी त्याला मारले, कसे तर, एक मोठा खड्डा करून, अर्धमेला झाल्यावर त्याला गाडून टाकले. अनपेक्षित अडचणीवर युक्तीने मात केली. नरभक्षक राक्षस व राम यांचा प्रत्यक्ष संग्राम मात्र, दुसरा एकहि, पंचवटीला जाईपर्यंत वर्णिलेला नाही. विराधवधानंतर राम शरभंग मुनीच्या आश्रमास गेला. त्यानंतर पुन्हा अनेक मुनींनी राक्षसांपासून रक्षण करण्याची विनंति केली व रामाने ती मान्य केली. मुनीनी केलेल्या राक्षसांच्या अत्याचारांच्या वर्णनात तुंगभद्रा नदी व जवळचे पंपासरोवर, तसेच मंदाकिनी नदी व चित्रकूट या दोन्हीचा उल्लेख आहे. म्हणजे हा सर्वच मुलूख राक्षसांच्या उपद्रवाने ग्रस्त होता. राम मुनीना म्हणाला कीं राक्षसांच्या शासनासाठीच पित्याच्या आज्ञेने मी वनात आलो आहे. मात्र दशरथाने रामाला असा काही आदेश दिलेला नव्हता!
यानंतर हे मुनिगण व राम-लक्ष्मण सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमाला ’दुथडी वाहणार्या नद्या’ पार करून गेले. कोणत्या नद्या हे सांगितलेले नसल्याने सुतीक्ष्णाचा हा आश्रम कोठे होता व राम चित्रकूटापासून किती दूर वा किती दक्षिणेला आला होता हे कळत नाही. ’माझ्या निवासासाठी मी कोठे कुटी बांधावी’ असे रामाने सुतीक्ष्णाला विचारले. चित्रकूट सोडल्यापासून हा वेळपर्यंत रामाने कोठेच कुटी बांधलेली नव्हती. सुतीक्ष्णाने म्हटले कीं हा माझा आश्रमच तुमच्या निवासाला योग्य आहे. पण रामाने ते मानले नाही. एक रात्रच मुक्काम करून राम निघाला तेव्हा सुतीक्ष्णाने म्हटले कीं दंडकारण्यातील मुनींचे आश्रम पहात फिरा व नंतर पुन्हा येथे या.

Thursday, April 22, 2010
पुन्हा सुरवात
मित्रहो,
गेले दहा महिने अमेरिकेत वास्तव्य असल्यामुळे या ब्लॉगवरचे लेखन थांबले होते. आता भारतात परत आलो आहे व पुन्हा अरण्यकांडापासून नवीन लेखन सुरू करणार आहे. माझ्या पूर्वीच्या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळत होता. नवीन लेखनालाहि तो मिळत राहील अशी आशा आहे. लेखनाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच राहील. धन्यवाद.
प्र. के. फडणीस

Subscribe to:
Posts (Atom)